आमची शाळा

                      जिल्हा परिषद प्राथमिक सेमी शाळा माणकेश्वरमळा ( धांदरफळ खुर्द )                                                                                                                                                                                          



                            '' ही आवडते मज मनापासूनी शाळा , लाविते लळा जशी माउली बाळा ''  श्रीक्षेत्र माणकेश्वर भगवान च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य भूमीत महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात २१ जून २०१० साली जि .प .प्राथ .शाळा माणकेश्वरमळा (धांदरफळ खुर्द )  नियमित नवीन शाळा सुरु झाली .  शाळेचे नवीन इमारत बांधकाम चालू असल्याने सुरुवातीला शाळा वटवृक्षाखाली तर कधी मंदिरात भरायची .ऊन , वारा ,पाऊस यांचा समर्थपणे सामना करत आम्ही दोघा शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य चालू ठेवले. निरागस व प्रेमळ विद्यार्थी दररोज सकाळी गुलाबपुष्प देऊन  Good Morning म्हणून आमचे स्वागत करायचे . दुपारच्या वेळेस वट वृक्षाखाली आमची पंगत बसायची . अभ्यास ,खेळ  ,गाणी  ,गप्पागोष्टीने शिक्षणात रंगत यायची  व सायंकाळी शाळा सुटल्यानंतर आमचे पाय तेथेच घुटमळायचे मुले Bye Bye / Good Evening म्हणायचे मग आम्ही घरचा रस्ता पकडायचो .नवीन इमारतीत जून २०११ साली शाळा भरायला सुरवात झाली . लोकसंपर्क वाढवला लोकसहभागातून शाळेचे रूप पालटले शाळेची रंगरंगोटी , भिंतीवर चित्र ,सुविचार, मुलांना बसायला बाके ,संगणक संच ,मैदान सपाटीकरण श्रीक्षेत्र माणकेश्वर देवस्थानच्या विहिरीतून शाळेला पिण्यासाठी पाणी पुरवठा , शा.पो.आ साठी भांडी ,शेगडी , लाउडस्पीकरसंच  ,ढोलताशा  ,पुस्तके अशी मदत पालकांनी व ग्रामस्थांनी केली . आमचा हुरूप वाढला . '' सर्वांगीण गुणवत्ता  '' हे ध्येय ठेवून  नवनवीन उपक्रम शाळेत राबविले .  वृक्षारोपन , बाजार  ,लेझीम  ,पथक  ,वाढदिवसाला पुस्तक भेट , आदर्श परिपाठ  ,सीडबँक ,सांस्कृतिक कार्यक्रम , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन  ,शैक्षणिक सहल , मनोरंजक खेळ त्यामुळे अल्पावधीत शाळेचा नावलौकिक वाढला . यासाठी आम्हांला श्रीक्षेत्र माणकेश्वर देवस्थान ट्रस्ट , माणकेश्वर तरूण मंडळ  शाळा व्यवस्थापन समिती पालक ग्रामस्थ सरपंच व ग्रा.पं. सदस्यव विविध संस्था पदाधिकारी  व जि.प..प्राथ.शाळा धांदरफळ खुर्द शाळेतील शिक्षक   शिक्षणविभागातील सर्व अधिकारी   या सर्वांचे सहकार्य लाभले याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत .                                                                                        धन्यवाद 

No comments:

Post a Comment