राष्ट्रीय सण समारंभ

 
                                                                   १५ ऑगस्ट २०१७

               जि. प.प्राथ. शाळा माणकेश्वरमळा शाळेत स्वातंत्र्यदिन समारंभ मंगळवार  दि. १५ /८ /२०१७ रोजी उत्साहात  पार पडला 
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री . मधुकर खताळ व  अध्यक्ष श्री . रामनाथ काळे तसेच श्री. मारुती काळे( शा व्य. समिती अध्यक्ष) व उपाध्यक्ष सौ . मीना गुंजाळ  उपस्थित होते  याप्रसंगी  मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन नारळ फोडून  करण्यात आले . व मुख्याध्यापक श्री . भागवत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले   मान्यवरांनी आपल्या मनोगतात शाळेची प्रशंसा केली व शाळा राबवित असलेले उपक्रम व  मूलांचे  भाषण , कवायत , समूहगीते गायन , कृतीगीत गायन अशा  कला गुणांना दाद दिली  व शिक्षकांचं कौतुक केले . शिक्षकाचे भाषणे झाले व त्यानंतर अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला .
 कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ , व शाळा व्यवस्थापन समिती  सदस्य माणकेश्वरमळा  परिसरातील  उपस्थित होते . मुलांना पालक , ग्रामपंचायत यांनी बिस्किटंपुडे व चॉकलेट खाऊ दिला त्याचे वाटप करण्यात आले 

कार्यक्रमाची क्षणचित्रे























No comments:

Post a Comment